I capture moments, happiness, emotions

​"आयुष्य हे सतत चालणारं नाटक आहे, जिथे प्रत्येक सेकंदाला नवीन हालचाल, नवीन आनंद आणि हुरहूर लावणाऱ्या भावना असतात. या प्रत्येक अनमोल क्षणाला अचूक टिपून, तुमच्या आठवणींना अधिक सुंदर बनवणे हेच आमचे ध्येय आहे." ​"आम्ही केवळ फोटो काढत नाही, तर गतीची ऊर्जा, चेहऱ्यावरील खऱ्याखुऱ्या आनंदाचे क्षण आणि मनात दाटून आलेल्या भावनांना कॅमेऱ्यात कायमचे कैद करतो. आमचे प्रत्येक छायाचित्र एक कथा सांगते."

Professional Filmmaker

Based in Chandrapur. Available vidarbha Maharashta
These are some of my filmmaking awards

Street
Play
2017

Chindi Bazar
Best Actor
2017

Best film
Kasturi
2025

Who Am I

माझा प्रवास: अभिनय, कला आणि संघर्षाची एक गोष्ट नमस्कार, मी जुगल विजय गणवीर. माझा हा प्रवास केवळ एक कलाकार म्हणून नाही, तर जिद्द आणि चिकाटीच्या बळावर स्वप्नांना सत्यात उतरवण्याचा एक ध्यास आहे. वयाच्या अवघ्या ३ ऱ्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले, पण माझ्या आईने खंबीरपणे उभे राहून वडिलांची कमी कधीही भासू दिली नाही आणि माझ्या प्रत्येक स्वप्नाला बळ दिले. कलेची सुरुवात आणि पायाभरणी: कलेची आवड मला वयाच्या ९ व्या वर्षी लागली. शाळेत असताना 'AIDS' या विषयावरील एकपात्री नाटकाने जिल्हास्तरावरील पहिले पारितोषिक मिळवून दिले आणि माझ्या कलाप्रवासाची मुहूर्तमेढ रोवली गेली. पुढे, १२ वीच्या शिक्षणानंतर सुप्रसिद्ध गायक व नाट्य दिग्दर्शक डॉ. अनिरुद्ध वनकर यांची भेट झाली, जी माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. बी.एस्सी.च्या शिक्षणापेक्षा कलेची ओढ अधिक असल्याने, डॉ .अनिरुद्ध वनकर यांच्या मार्गदर्शनाखाली FTII मध्ये वर्कशॉप करण्याची संधी मिळाली. इथूनच माझ्या व्यावसायिक अभिनयाचा प्रवास सुरू झाला. नाट्यसृष्टीतील यशस्वी वाटचाल: 'चिंधी बाजार', 'ध्यानी मनी', 'खेळ मांडला' आणि 'फूटपाथ' यांसारख्या दर्जेदार राज्यनाट्यांमध्ये मी काम केले. 'चिंधी बाजार' या नाटकासाठी 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' हा पुरस्कार माझ्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. आजवर मी २०० हून अधिक व्यावसायिक नाटकांमध्ये अभिनय केला आहे. अभिनयासोबतच दिग्दर्शनाची आवड जोपासत 'फूटपाथ' या नाटकाचे यशस्वी दिग्दर्शन केले. या कार्याची दखल घेत 'नटरंग सांस्कृतिक कला मंच' या संस्थेने माझी 'महाराष्ट्र राज्य अध्यक्ष' म्हणून निवड केली. चित्रपट आणि अभिनय प्रवास: चित्रपट निर्माते विजय भानसे यांच्या मार्गदर्शनाखाली मला खूप काही शिकायला मिळाले. २०१७ मध्ये 'द ग्रेट बाबा' या चित्रपटातून मुख्य भूमिकेत पदार्पण केले. तसेच, सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते पथनाट्यासाठी 'उत्कृष्ट दिग्दर्शक' म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार मिळवणे हा माझ्यासाठी अत्यंत गौरवाचा क्षण होता. शोभा खोटे, विजू खोटे, मकरंद अनासपुरे , हेमा मालिनी आणि अलका कुबल यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचे भाग्य मला लाभले. २०१९ मध्ये 'दिलासा' या लघुपटाचे लेखन, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन मी स्वतः केले. २०२३ मध्ये 'रावसाहेब' आणि 'अरण्य' यांसारख्या मोठ्या पडद्यावरील चित्रपटांत काम करण्याची संधी मिळाली, तर २०२६ मध्ये 'कस्तुरी' या लघुपटाची निर्मिती व प्रोडक्शनची जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडली. सध्या ४ ते ५ नवीन कथांवर माझे काम सुरू आहे. निवेदक आणि मिमिक्री आर्टिस्ट: अभिनयाव्यतिरिक्त ५०० हून अधिक अँकरिंग आणि कॉमेडी स्टेज शोजचा अनुभव माझ्या पाठीशी आहे. मिमिक्री आर्टिस्ट म्हणून मी सनी देओल, अमिताभ बच्चन, अमरीश पुरी, शरद पवार, सुधीर मुनगंटीवार, लालू प्रसाद यादव,दादा कोंडके, निळू फुले आणि त्या पेक्षा अधिक यांसारख्या दिग्गज व्यक्तींच्या, तसेच 'ओगी अँड द कॉक्रोचेस', 'मोटू पतलू', 'शिन चॅन' यांसारख्या लोकप्रिय कार्टून पात्रांच्या आवाजात हुबेहूब मिमिक्री करण्यासाठी ओळखला जातो. आयुष्यातील प्रत्येक वळणावर नवीन शिकत, रसिकांच्या प्रेमाच्या जोरावर कलेचा हा प्रवास मी अधिक समृद्ध करत आहे.

एकच स्वप्न एकच ध्यास, ग्रामीण भागांतील कलेचा विकास

Featured gallery

Some of my favorite pictures

Keep in touch

Name

​© 2026 Lotus Films Academy. All Rights Reserved.